भजनी मालिका
← भजनांकडे परत

साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग

sakshibhut atma mhanati ahe dehi | vayan kan videhi jahala mag

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साक्षीभूत आत्मा म्हणती आहे देही । वायां कां विदेही जाहला मग ॥१॥ नानामतें तर्क करितां विचार । पापांचे डोंगर अनायासें ॥२॥ देहीं असोनि देव वायां कां शिणती । एका जनार्दनीं फजिती होती तया ॥३॥