भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची

sakarechen nam ghetan kale godi | taisi amhan jodi vaishnavanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हा तरी खेळावरी चित्त ॥२॥ तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥