भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण

sakalagunen sampanna | ek devachen lakshan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥ वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥ षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥