भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ तपांचें तें तप । सोपा राममंत्र जप

sakal tapanchen ten tap | sopa ramamantra jap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ तपांचें तें तप । सोपा राममंत्र जप ॥१॥ नाहीं साधनांचे कोडें । राम म्हणा वाडें कोडें ॥२॥ न लगे जप तप अनुष्ठान । रामनामें सर्व साधन ॥३॥ एक जनार्दनी म्हणतां राम । नासे संसार भवभ्रम ॥४॥