भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ सुरां मुगुतमणीं । जो का त्रैलोक्याचा धनी

sakal suran mugutamanin | jo ka trailokyacha dhani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सकळ सुरां मुगुतमणीं । जो का त्रैलोक्याचा धनी । भक्ता अभयदानी । उदारपणें ठाकला ॥१॥ आठवावा वेळोवेळां । भय नाहीं कळिकाळा । लागलासे चाळा । न फिरोचि माघारीं ॥२॥ मागां बहुतां अनुभव । तारियेले पापीं सर्व । एका जनार्दनीं स्वयमेव । पंढरीराव पुरवीत ॥३॥