भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी

sakal sattadhari | vhaven aisen kay hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥ तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥