भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं

sakal hi majhi bolavan kara | paratoni ghara javen tuhmin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥ कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निंश्चिती झाली तेथें ॥२॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥ वाढवितां लोभ होईल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥४॥ धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥ तुका म्हणे तुम्हांआम्हां हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥