भजनी मालिका
← भजनांकडे परत

सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा

sairatagodhanen chalati vanan | tayamagen chale vaikunthicha rana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सैराटगोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सांवळे चतुर्भुज मेघःश्याम वर्ण । गाईगोपाळां समवेदा खेळे मनमोहन ॥२॥ यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडुफळी गाडियांसम ॥३॥ एका जनार्दनीं मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥