भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें

sahaj sahaj aisha karitati goshti | pari sahajachi bheti virala janen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सहज सहज ऐशा करिताती गोष्टी । परि सहजाची भेटी विरळा जाणें ॥१॥ सहजाच्या आवडी विद्या अविद्या तोडी । जाणीव नेणीवेची राहुं नेदी बेडी ॥२॥ जाणीव जाणपण नेणिवां नेणपण । दोहींच्या विंदाने सहजाचें दर्शन ॥३॥ एका जनार्दनीं जाणीव नेणीव । सहज चैतन्यासी देउनी ठेला खेव ॥४॥