भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी

sadhu mhanaven tayasi | daya kshama jyachya dasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधु म्हणावें तयासी । दया क्षमा ज्याच्या दासी ॥१॥ जयापाशी नित्य शांती । संत जाणा आत्मस्थिती ॥२॥ ऋद्धिसिद्धि त्यांच्या दासी । भुक्ति मुक्ति पायांपाशी ॥३॥ एका जनार्दनीं साधु । जयापाशी आत्मबोधु ॥४॥