भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं

sadhanachya kanhin na pade kachatin

साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं । जावोनी कपाटी काय पाहूं ॥१॥ सुंदर श्रीमुख विटे जें शोभलें । कर मिरविले कटावरी ॥२॥ तो हा श्रीहरी उभा भिवरेतीरीं । भक्तां अभयकरी पालवितो ॥३॥ कर्ममेळा म्हणे सर्व सुखाचें आगर । तो हा विटेवर उभा असे ॥४॥