भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी

sadhan sopen nam vache | parvat bhangati papachen | vishvasitaten sache | nam tarak kaliyugi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधन सोपें नाम वाचे । पर्वत भंगती पापाचें । विश्वासितातें साचे । नाम तारक कलियुगी ॥१॥ अहोरात्र वदता वाणी । ऐसा छंद ज्याचे मनीं । त्याचेनि धन्य ही मेदिनी । तारक तो सर्वांसी ॥२॥ एका जनार्दनीं नाम । भाविकंचें पुरे काम । अभागियांतें वर्म । नव्हे नव्हे सोपारें ॥३॥