भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन

sadhan nako anik kanhin | kari lavalahi kirtan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधन नको आणिक कांहीं । करी लवलाही कीर्तन ॥१॥ मोक्ष मुक्ती ठाके पुढें । येर अवघें तें बापुडें ॥२॥ भक्ति साधे नवरत्न । कीर्तनें होती ते पावन ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तन । ओहं सोहं कोहं जाती पळुन ॥४॥