भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती

sadhak sarvada pusati | kon badha chittavrutti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साधक सर्वदा पुसती । कोण बाधा चित्तवृत्ती ॥१॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविधा वृत्ती वाढे ॥२॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नोहे एकविधता ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण । चित्तचैतन्य संपुर्ण ॥४॥