भजनी मालिका
← भजनांकडे परत

सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ

sabarabharit dev asoni javali | vyartha te kavali mruttika jal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सबराभरित देव असोनी जवळी । व्यर्थ ते कवळी मृत्तिका जळ ॥१॥ ज्याचीया सत्तेचा पंचभुत खेळ । विसरती गोपाळ तयालागीं ॥२॥ वल्कलें वेष्टन भस्माचें धारण । करिती धूम्रपान वाउगेंचीं ॥३॥ एका जनार्दनें हृदयस्थ असतां । कां हो शीण तत्त्वतां करिताती ॥४॥