भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं

ram mhane vate chali | yadnya paulapaulin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम म्हणे वाटे चाली । यज्ञ पाउलापाउलीं ॥१॥ धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम म्हणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥२॥ राम म्हणे ग्रासोग्रासीं । तोचि जेविला उपवासी ॥३॥ राम म्हणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥४॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥५॥