भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणतां तरे जाणता नेणतां । हो का यातिभलता कुळहीन

ram mhanatan tare janata nenatan | ho ka yatibhalata kulahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम म्हणतां तरे जाणता नेणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥१॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम म्हणे तया नये जवळी भूत । कैचा यमदूत म्हणतां राम ॥२॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥३॥ तुका म्हणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥४॥