भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम म्हणतां राम चि होईजे । पदीं बैसोन पदवी घेईजे

ram mhanatan ram chi hoije | padin baison padavi gheije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राम म्हणतां राम चि होईजे । पदीं बैसोन पदवी घेईजे ॥१॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥२॥ तुका म्हणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥३॥