भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर

putra jala chor | mayabapa harsha thor

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥ आतां काशासाठी जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥ आइते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥ मानिली निंश्चिती । नरका जावया उभयतीं ॥३॥ झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥ तुका म्हणे बेटया । भांडवल न लगे खटया ॥५॥