भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें

purvipasuni jyanchen denen | valmika penen ramanamen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वीपासूनी ज्यांचें देणें । वाल्मीका पेणें रामनामें ॥१॥ अजामेळ पापराशी । नामेंची त्यासी उद्धार ॥२॥ गणिका व्याभिचारिणी नारी । सरती करी रामनामें ॥३॥ एका जनार्दनीं नाम । जया निष्काम गोमटें ॥४॥