भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं

purvi hiranyakashyapache kulin | nama janme bhumandalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पूर्वी हिरण्यकश्यपाचे कुळीं । नामा जन्मे भूमंडळीं ॥१॥ तेथें हरिभक्ति करी । तेणें तोषला नरहरी ॥२॥ घेउनी अवतार । राखी भक्तासी सादर ॥३॥ भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं शरणागत ॥४॥