भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं

puravili ali | je je keli te te kalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥ तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥