भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला

puranincha itihas | god ras sevila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥ भावें घ्या रे भावें घ्या रे । एकदा जा रे पंढरिये ॥२॥ भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥३॥ पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥४॥ घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥५॥ तुका म्हणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥६॥