भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती

puranik mhanaviti | janoni kande te bhakshiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥ अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥ध्रु.॥ श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥ बदराईच्या पदी दाढा । लगे तुकयाचा हुंदडा ॥३॥