भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं

purali dhanv kadiye ghei | pudhen payin na chalavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥ कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥ अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥२॥ तुका म्हणे बोलवेना । लावीं स्तनां ईश्वरें ॥३॥