भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या

pur ala anandacha | lata usalati premachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥२॥ तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥३॥