भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथें

punyavant jiv bhumi punya desh | shriharichi vishesh bhakti jethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पुण्यवंत जीव भूमी पुण्य देश । श्रीहरीची विशेष भक्ति जेथें ॥१॥ जाणोनियां इंद्र पाठवी विमान । आणवी सुमनें कांतीयेची ॥२॥ देवाच्या पूजना सूमनें न मिळतां । राय पाचारीत वनमाळा ॥३॥ सेवक म्हणती सायंकाळी कांही । दिसों येत नाहीं रात्रीमाजीं ॥४॥ रात्रीं जाग्रणा बैसली रक्षक । लाविला वृंतारक अग्नीकाष्ठीं ॥५॥ सावधान ठायी जागती सर्वही । विमान तें समयीं आलें तेथें ॥६॥ तोडिली सुमनें गुप्तरुपें त्यांनी । विमान तों तेथोनी न चलेची ॥७॥ एका जनार्दनीं देवदूत कष्टीं । न चले त्यांची युक्ति काहीं केल्या ॥८॥