भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया

punyapapa thav nahin sukhaduhkha | hanilabhashanka nasaliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥ अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥२॥ जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥३॥ तुका म्हणें देह वाहिला विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥४॥