भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी

punit kelen vishnudasin | sangen apuliya doshi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥