भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें

pujya ekasanin asanin asan | baisatan gaman mateshin ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥ संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥ तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ तें ॥३॥