भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण

puja samadhanen | atishayen vadhe sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥ हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥२॥ तुका म्हणे माथा । पायीं माझा तुम्हां संतां ॥३॥