भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन

puja pujyaman | kathe ubhe harijan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन ॥१॥ ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥२॥ गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥३॥ शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥४॥ तुका म्हणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥५॥