भजनी मालिका
← भजनांकडे परत

पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां

pruthak mi sangon kiti | dharma niti sakalan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥ अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥ तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥