भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये

prayagadi tirthe ahet samartha | pari purati manorath pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥ आनंद सोहळा त्रैलोक्य अगाध । पंढरीये भेदाभेद नाहींसत्य ॥३॥ एका जनार्दनी क्षेत्रवासी जन । देवा ते समान सत्य होती ॥४॥