भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक

prayagadi kshetren ahet kalpakodi | taya ahe khodi ek ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥ मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥ म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥