भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं

pratimachi devo aisa jyacha bhavo | to na kari nirvaho amhanlagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥ असतां सबराभरित बाहेर जो अंतरीं । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥ द्वारका पंढरी देवयात्रा करी । सर्वत्र न धरी तोचि भावो ॥३॥ सुक्षेत्रीं पुण्य मा अन्यत्र तें पाप । नवल हा संकल्प कल्पनेचा मतवाद्या ॥४॥ द्वारका पंढरी देवयात्रा करी । येर काय भारी वोस पडे ॥५॥ एक जनार्दनीं स्वतः सिद्ध असे । विस्मरण स्मरण होत असे नाथिलें तें पिसें ॥६॥