भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा

prasiddha ha ase jaga | avaghya rangarangacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥१॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥२॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥३॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥४॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥५॥ तुका म्हणे दुसऱ्या भावें । छाया नावें न देखवे ॥६॥