भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंची सदा सक्त । रामनामीं नाहीं चित्त

prapanchi sada sakta | ramanamin nahin chitta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंची सदा सक्त । रामनामीं नाहीं चित्त ॥१॥ तया म्हणावे तें काय । व्यर्थ शिणविली माय ॥२॥ वायां जिणें पैं तयाचें । सदा मान दंभीं नाचे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तया सोडवील कोण ॥४॥