भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा

praniyasi mantra sopa | datta datta vache japa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्राणियासी मंत्र सोपा । दत्त दत्त वाचे जपा ॥१॥ आणीक लगे साधन । दत्तनामें घडे ज्ञान ॥२॥ न लगे योगयाग पाही । दत्तावांचुन नेणें कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं वेधलें मन । मनचि जालें उन्मन ॥४॥