भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा

prani guntale sansarashrama | na kale mahima namacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्राणी गुंतले संसारश्रमा । न कळे महिमा नामाचा ॥१॥ नामें तरलें पातकी । मुक्त जाले तिन्ही लोकीं ॥२॥ व्यास शुकादिक पावन । नामेंचिक पावले बहुमान ॥३॥ वाल्हा कोली अजामेळ । गणिका दीन हा चांडाळ ॥४॥ एका जनार्दनीं नाम पावन । पातकी उद्धरीले परिपूर्ण ॥५॥