भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी

pranapananchi milani | shakti chetavi kundalini

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्राणपानांची मिळणी । शक्ति चेतवी कुंडलिनी ॥१॥ ती आधारशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा घाट ॥२॥ कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या हाटा ॥३॥ साधितां उल्हाट शक्ति उलटे । उघडलें ब्रह्मारंध्राचें कपाट ॥४॥ शरीराकारें ते बोलिली । एका जनार्दनीं पुतळी ॥५॥