भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें

pran rakshanapuraten | yogi magati bhiksheten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्राण रक्षणापुरतें । योगी मागती भिक्षेतें ॥१॥ तैसा साधावा हा योग । जेणें साधे अंतरंग ॥२॥ रिघोनी कमळिणीपाशीं । भ्रमर लोंधे अमोदासी ॥३॥ कोरडेंक काष्ठ भेदूनि जाय । तो कमळदळीं गुंतोनि राहे ॥४॥ एका जनार्दनीं योग । ऐसा साधावा अनुराग ॥५॥