भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये

praktanachya yogen alashavari ganga | snan kay jaga karun naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥ उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राम्हणीं वंदूं नये ॥ध्रु.॥ कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र म्हणोन घेऊं नये ॥२॥ यातिहीन झाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥३॥ भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥४॥