भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें

pragatalen dnyan | narayan bhutin ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥ अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥ देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥ तुका म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥