भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोट धालें मग न लगे पंगती । झालिया निंश्चिती खेळ गोड

pot dhalen mag na lage pangati | jhaliya ninshchiti khel god

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पोट धालें मग न लगे पंगती । झालिया निंश्चिती खेळ गोड ॥१॥ आपुलिया हातें देई वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥ घराचा विसर होईल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥२॥ तुका म्हणे तों चि वरी करकर । मग हें उत्तर खंडईल ॥३॥