भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी

pita sangatan goshti | tayasi karito chavati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिता सांगतां गोष्टी । तयासी करितो चावटी ॥१॥ नायके शिकविलें । म्हणे म्हातार्‍यासी वेड लागलें ॥२॥ बाईल बोलताचि जाण । पुढें करून धांवे कान ॥३॥ ऐसें नसावें संतान । वायां भूमीभार जाण ॥४॥ एका जनार्दनीं अमंगळ । त्याचा होईल विटाळ ॥५॥