भजनी मालिका
← भजनांकडे परत

फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची

phugadi ghali mipanachi | veni gumphi trigunachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
फुगडी घाली मीपणाची । वेणी गुंफी त्रिगुणाची ॥१॥ चाड नाहीं कोनाची । आण सदगुरुचरणांची ॥२॥ फुगडी घाली आज गे । नाचू सहजा सहज गे ॥३॥ एका जनार्दनीं निज गे । वंदू संतचरणरज गे ॥४॥ _______________________________________________ गोपांचे खेळ