भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायरवे अन्न । मग करी खेदक्षीण

payarave anna | mag kari khedakshin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पायरवे अन्न । मग करी खेदक्षीण ॥१॥ ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥ जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥२॥ तुका म्हणे शंका । हित आड या लौकिका ॥३॥