भजनी मालिका
← भजनांकडे परत

पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें

payanchya prasaden | kanhin bolilon vinoden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ती ॥ध्रु.॥ नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका म्हणे ॥३॥