भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतितपावना । दिनानाथा नारायणा

patitapavana | dinanatha narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥१॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रम्हांडनायका । भक्तीजनाच्या पाळका ॥२॥ जीवांचिया जीवा । तुका म्हणे देवदेवा ॥३॥